HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज: रामनगर येतील इसमाने गळफास लावून केली आत्महत्या...

ब्रेकिंग न्यूज: रामनगर येतील इसमाने गळफास लावून केली आत्महत्या…

गडचिरोली / प्रतिनिधी* – कोरोना काळामध्ये हलाखीचे जीवन जगत असतानाच अचानक घरच्या कमावणाऱ्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे श्री. रवींद्र हजारे (४२) रा. रामनगर गडचिरोली येथील इसमाने आपल्या राहत्या घरीस गळ फास घेऊन आत्महत्या केली. संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला त्यामुळे रोजगार हरविले परिवाराचे संगोपन करण्याचे आव्हान असतानाच त्याने असे टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सकाळी दिवस उजाडला तरी उठले नाही हे बघण्यासाठी रवींद्र ची पत्नी बाजूच्या रुमचे दार उघडण्यासाठी गेली असता आतू गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती गडचिरोली पोलीस ला कळविण्यात आले असता. घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी हजर झाले असून, त्यांचा मृत्यदेह शवविच्छेदना करीता जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. रवींद्र च्या अश्या अचानक केलेल्या आत्महत्येमुळे हजारे परिवार वर दुखःचे डोंगर कोसळले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!