मूलभूत सुविधाकडे विरुर स्टेशन ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…#राजुरा तालुक्यात भोंगळ कारभाराने गाजत आहे विरुर ग्रामपंचायत…

634

राकेश कडुकर (प्रतिनिधी)

राजुरा: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत विरुर स्टेशन ची आहे. परंतु आजही गावात पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा या सारख्या मूलभूत गरजे कडे ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे. याचे मुख्य कारण ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी स्थायी राहत नाही आणि ग्रामपंचायत कमिटी तीन तेरा नऊ अकरा असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.

गावकऱ्यांनी ग्रापंचायतीच्या भोंगड कारभाराच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या परंतु याकडे वरिष्ठ अधिकारी कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. मागील काही दिवसापासून गावातील, इंदिरा नगर , गांधी नगर व बस स्थानक क्षेत्रातिल पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने विरुर वासीयांना पाण्या अभावी होत असलेला त्रास सहन करावा लागत आहे व पथ दिव्याचे विद्युत पुरवठा दिवस रात्र सुरू आहे. या सर्वांकडे कमालीचे सतत दुर्लक्ष ग्रामपंचायत कडून होत आहे. पाणी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.