रक्तदानाच्या मदतीसाठी सरसावले दोन युवक…समाजापुढे निर्माण केला आदर्श

489

गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

भर उन्हात दुपारची वेळ आगीने पेटत होती. एकीकडे लाॅकडाऊन लागलेला कोरोनाची भीषण गंभीर परिस्थिती सांगत होती. याच कचाट्यात सापडलेला तो गरजू माणुस अत्यावश्यक रक्ताच्या सोयीसाठी दवाखान्यात जीवपोटी वाट  बघत होता…कुणीतरी मदतीला नक्की येणार या आशेपोटी तो माणुस तग धरुन उभा होता…तेवढ्यात दोन युवक तिथे हजर झाले आणि आशेचे किरण उजाळले..

दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण कमी होऊन बरेचसे रुग्ण बरे होताना दिसत आहेत.रुग्णसंख्येचा आकडा काही प्रमाणात कमी झाली असली तरी शासनाचे नियम पाळून खबरदारी घ्यायची गरज आहे.म्हणुन घरी राहा सुरक्षित राहा. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे’ या म्हणी प्रमाणे कोंढाळा येथिल दोन युवक मित्र… अत्यावश्यक रक्ताच्या गरजेपाटी, रक्ताच्या  नात्यासाठी मदतीला सरसावले. सूरज चौधरी (२२)आणि विवेक भुते (२१)असं या रक्तदात्या युवकांचे नाव आहेत.

विशेष म्हणजे  डिसेंबर महिन्यामध्ये सूरज ने तर विवेक ने मार्च महिन्यामध्ये रक्तदान केलेले होते पण आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकीची उमदा प्रचिती देत समाजाच्या हितासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

सूरज आणि मयुर हे कोंढाळा येथिल रहिवासी आहेत.नेहमी प्रमाने दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते.अचानक दुपारच्या वेळी सुरज ला मित्राचा फोन आला आणि अत्यावश्यक डोनर हवा , ही सारी हकीकत त्याच्या कानावर घातली.त्या ला माहिती होतं की मागे पण अत्यावश्यक रक्ताच्या तुटवड्यामुळे त्या गरजू व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता.ही बाब त्याच्या लक्षात आली. आणि आपल्या मित्राची गोष्ट पुर्ण ऐकून वेळेचं भान ठेवून दुस-या व नजिकच्या मित्राला मदत मागितली.

आईने  घरी विचारले की, इतक्या उन्हात कुठे चालला रे ? लाॅकडाऊन पण आहे ना ? इतक्यात सूरजने आईला सर्व कहाणी ऐकवली . ती  कहाणी ऐकवताचं आईने सुद्धा त्याला प्रतिसाद देता जाण्यास परवानगी दिली.आणि म्हणाली जा रे बाळा आपण मदतीला धावले पाहिजेत.आपल्या कडे जे असेल न ते वेळेवर गरजू लोकांना दिलं पाहिजेत,यावर प्रतिउत्तर देताना, आई  आपल्या गरिब माणसाकडे काय आहे गं देण्याइतपत हा रक्तच तर आहे , आपल्या कडे जो आपण दान करू शकतो‌. हे मोलाचं वाक्य बोलून तो प्रवासाला निघाला.

क्षणाचा ही विलंब न करता,मयुर ने आपल्या मालकाची परवानगी घेत सुट्टी काढली आणि सूरजने पण आपले काम बाजूला सारुन थेट ब्रम्हपुरी गाठली. ख्रिस्तानन दवाखान्यात जाऊन या दोन्ही युवकांनी त्या अत्यावश्यक गरजू व्यक्तीला रक्तदान करुन जीव वाचविला…

त्या व्यक्तीने या दोघांचे खुप खुप आभार मानले. शेवटी गावाकडे निघताना अचानक त्याच्या मैत्रिणी ला  कळले की सूरज रक्तदान करायला ब्रम्हपुरी ला आला आहे म्हणून ती सुद्धा धावतचं तिथे पोहचली येताना मात्र आईने त्या दोघांसाठी पिशवी भरुन पाठवलेली होती.

ती बघून त्यांना खूप आनंद झाला की,आईने आपल्या साठी येवढं सगळं केलं म्हणुन. मग त्यांनी ती फळे  खाऊन घेतली.. एकंदरीत  आईची शिकवण आईने आपल्या मुलांवर संस्काराचा मुलामा चढवून ,करुणेचा हात फिरवून माणुसकीचे धडे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताची नाती तयार करून माणुसकीचे दर्शन घडविले..