HomeBreaking Newsप्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा! प्रेयसीच्या वडिलांनी धाक दाखविल्यानंतर तरुणाची आत्महत्या...

प्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा! प्रेयसीच्या वडिलांनी धाक दाखविल्यानंतर तरुणाची आत्महत्या…

Advertisements

कोल्हापूर, 25 मे: कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील फराकटेवाडी या गावात एका युवकानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकानं जीवे मारण्याची धमकी दिल्यानं संबंधित युवकानं घाबरून टोकाचं पाऊल उचललं आहे. अभिजित फराकटे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीच्या वडिलांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस करत आहेत.

Advertisements

आत्महत्या केलेल्या युवकाचं गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण संबंधित मुलीच्या वडिलांना लागली.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी थेट अभिजितच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली. प्रकरण एवढ्यावरचं थांबवलं नाही, तर तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रेयसीच्या वडिलांच्या धमकीला घाबरलेल्या अभिजितनं घरातील विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.

आपल्या मुलानं विष प्राशन केल्याचं समजताच, अभिजितच्या आई वडिलांनी त्याला तातडीनं कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाचं अचानक त्याची प्रकृती खालावल्यानं त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीच्या वडिलांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!