मुंबईत निधन पावलेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ बल्लारपुरात भोजनदान…#प्राणीप्रेमी श्रुती लोणारे यांचा उपक्रम…

0
205
Advertisements

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
मुंबईत असणाऱ्या ,आणि मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तीच्या मेव्हण्याचे कोरोनाने मुंबईत नुकतेच निधन झाले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बल्लारपुरातील प्राणीप्रेमी श्रुती लोणारे यांनी गरजू लोकांना आणि प्राण्यांना भोजनदान देऊन मयताला अनोख्या रीतीने आदरांजली वाहिली.
सविस्तर वृत्त असे की ,मुंबई येथील आशुतोष सूर्यवंशी हे मुक्या प्राण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करतात.बल्लारपूर येथील सुपरिचित प्राणीप्रेमी श्रुती लोणारे यांच्याही ते नेहमी संपर्कात असतात आणि सहकार्यही करतात .
सूर्यवंशी यांचे मेव्हणे प्रशांत डावरे या तरुण युवकाचे नुकतेच कोरोना ने दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती लोणारे यांनी बल्लारपुरात गरजू ,गरीब लोकांना आणि भटक्या प्राण्यांना भोजनदान देऊन वेगळ्या रीतीने आदरांजली वाहिली.
या उपक्रमासाठी आदित्य शिंगाडे ,त्यांचे पती राकेश चिकाटे ,अभिषेक सातोकर ,रोहन कळसकर यांनी त्यांना सहकार्य केले.
बल्लारपूर निवासी प्राणीप्रेमी श्रुती लोणारे या सांपत्तिक स्थिती बरी नसतानाही बऱ्याच दिवसापासून भटक्या श्वानांसाठी भोजनाची व्यवस्था करत आहेत. काही व्यक्ती ,संस्था अधी मधी त्यांना सहकार्याचा हात देतात .तथापि ते सहकार्य पुरेसे ठरत नाही आहे.
शासनाकडून ,सामाजिक संस्थाकडून भरीव स्वरूपाच्या सहकार्याची गरज असल्याचे श्रुती यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here