ब्रेकिंग मर्डर! वरोऱ्यात चाकूने युवकाचा मर्डर; आरोपी युवकाला अटक

1043
वरोरा : वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून व कट काटशह यातून एकमेकांवर खुनी हल्ले होत आहे यातच आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 वाजता च्या दरम्यान शहराच्या गांधी चौकात निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
 
सूकराम वसंत आलम राहणार अंबादेवी वार्ड असे मृतकाचें नाव असून तो पाहुणा येथील रहिवाशी आहे. त्याचे निलेश ढोकेया 19 वर्षीय युवकाशी भांडण झाले असता निलेशने खिशातील चाकू काढून सूकराम च्या सरळ गळ्यावर वार करून जागीच ठार केले.
 
पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी पोहचले व आरोपी निलेश ला ताब्यात घेतले आहे. सूकराम चे नुकतेच काही वर्षापूर्वी लग्न झाले असल्याचे बोलल्या जात आहे. या भरदिवसा झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहे.