Home Breaking News एक हाथ मदतीचा उपक्रमांतर्गत शिक्षकांकडून सावलीची माया... युवा संकल्प संस्थेचा मदतीचा हात...

एक हाथ मदतीचा उपक्रमांतर्गत शिक्षकांकडून सावलीची माया… युवा संकल्प संस्थेचा मदतीचा हात…

 नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

चामोर्शी: भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना दिसतात. बेड,ऑक्सीजन,औषधी,एम्बुलंस मिळत नाही तर बऱ्याच लसिकरण केंद्रात लस उपलब्ध नाही तसेच सावलीची व्यवस्था सुद्धा नाही. लसीकरनाच्या ठिकाणी भर उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
संपूर्ण देशभरात या कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील शिक्षकवृंदानेही पुढे येत या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या दृष्टीने सोशल मीडिया द्वारे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शी मध्ये कार्यरत शिक्षक,प्राध्यापक सोबतच तालुका व जिल्ह्याबाहेरील शिक्षक व इतर दात्यांनी सुद्धा या मदतीत अमूल्य अशी भर घातली.
एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या निधीतुन सर्वानुमते ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कायमस्वरूपी पत्र्याचा शेड बांधला.तसेच चामोर्शी अंतर्गत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा, घोट, कोनसरी, रेगडी आमगाव, मार्कन्डा क., ग्रामिण रुग्णालय आष्टी व लसीकरण केंद्र ठाकरी येथे लसिकरण केंद्रासमोर हिरवी नेट बांधून सावलीची व्यवस्था केली.लसीकरनाच्या वेळी सामान्य लोकांची आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने भर उन्हात त्यांना तासनतास उभे रहावे लागत आहे.त्यामुळे चक्कर येणे,बीपी वाढने व इतर समस्या तयार होत होत्या.आता या कायमस्वरूपी शेड व हिरव्या नेट ची व्यवस्था शिक्षकांकडून केल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे.
सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रविण पोटवार, आशिष जयस्वाल, प्रदिप भुरसे, सुजित दास, माणिकचंद रामटेके, संतोष गुट्टे व सचिन गायधने या शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे या उपक्रमात युवा संकल्प संस्था भेंडाळा जि. गडचिरोली यांनी हिरिरीने सहभागी होऊन खूप मोलाचा हातभार लावला. त्यामध्ये युवा संकल्प संस्था चे अध्यक्ष राहुल वैरागडे, उपाध्यक्ष चेतन कोकावार, सुबिर मिस्त्री, विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, वैभव मंगर यांनी सहकार्य केले व पुढेही याप्रकारची मदत सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी व युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या बद्दल ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.लिला मदने,डॉ.शेषराव भैसारे,औषध निर्माण अधिकारी प्रतीक पुनप्रेड्डीवार,राजेश ढाले,उमेश राठोड,कुशल कवठेकर,चन्द्रकांत गव्हारे आणि समस्त रुग्णालयीन कर्मचारीच्या वतीने या महत्वाच्या सोयीबद्दल आभार मानले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्यात बालिका गंभीर जखमी…दुर्गापूर परिसरातील घटना…

चंद्रपुर: आज रात्रौ ८:३० वाजता दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा जगजीवन कोपुलवार बाहेर अंगणात खेळत असताना बिबट्याने पकडल्याने ती गंभीर जखमी...

टायगर ग्रुप च्या सदस्यांनी बुजवले खड्डे..! महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ टायगर ग्रुपचे सदस्य रस्त्यावर

आल्लापल्ली : सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील ओव्हरलोड ट्रकान मूळे रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्डे झाले आहे त्या खड्ड्यानं मुळे रोज अनेक अपघात होत आहेत आणि अपघातांची...

गोंडपिपरी तालुक्यांतील अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे विजेचा लपंडाव. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची गांवकराची मागणी

-शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे परीसरात विघुत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दररोज पधरा मी ते...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

Recent Comments

Don`t copy text!