Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी शिक्षक संघटनेकडून तालुका प्रशासनाला दोन लाखाची मदत...#प्राथमिक शिक्षक कृती...

कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी शिक्षक संघटनेकडून तालुका प्रशासनाला दोन लाखाची मदत…#प्राथमिक शिक्षक कृती समिती गोंडपिपरीचा पुढाकार

गोंडपिपरी; महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहलेल्या संकटाला तोंड देत आहे.राज्यातील जनता व प्रशासन या कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटासोबत जोमाने लढत आहे.एकूणच चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रुग्ण आढळत आहे.

मृत्यूचा आकडाही वाढत आहे.गोंडपिपरी तालुक्याला पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यावरून व लोकप्रतिनिधींकडून मदत मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळते.मात्र अशातच प्राथमिक शिक्षक संघटना प्रत्येक आपत्तीत तालुक्याला साहाय्य करण्यास कटिबद्ध असते.

सध्या स्थितीत गोंडपीपरी तालुक्याची स्थिती बिकट आहे.दररोज नागरिकांचा बळी जात आहे.सुविधांच्या किव्हा पैशा अभावी कुणाचा जीव जाऊ नये.नागरिकांना योग्य उपचार मिळावा.या हेतूने सामाजिक दायित्व जोपासत दि.४ मंगळवारी तहसीलदारांना दोन लाख रुपये प्राथमिक शिक्षक कृती समितीने मदत करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तालुक्यात प्राथमिक शिक्षक ३३० असून प्रत्येकी अडीज हजार तर काही जणांकडून स्वईचेने पैसे जमा करण्यात येत आहे.येत्या आठवड्याभरात ही मदत 5 लाखाच्या वर पोहचणार असल्याचे.संघटनेचे अध्यक्ष खोब्रागडे यांनी माहिती दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रेम खोब्रागडे,रणजित तेलकापल्लीवर,विक्रम ताळे,महेश ताटेवार,रत्नाकर चौधरी,सिद्धार्थ रंगारी,दुशांत निमकर,गुणवन्त कुबडे,परमानंद इंदोरकर, सुनील बावणे,आकाश झाडे, अभय कासमगोटूवार ,प्रमोद दुर्गे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षकांची उपस्थित होती.तालुका प्रशासनाला केलेल्या मदतीमुळे तालुक्यात सर्वत्र शिक्षक संघटनेचे कौतुक होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!