चिमूर:- चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत नेरी पोलीस चौकी हद्दीतील मौजा मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात पाहिजे असलेले अवैधरीत्या देशी दारू विक्रिचे उद्देशाने साठवून ठेवल्या असल्याचे खात्रीशीर मुखबिराचे खबरेवरुन चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व नेरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड यांच्या पोलीस सहकार्यांना घेऊन मोटेगाव -काजळसर जंगल शिवारात अवैधरीत्या देशी दारुमुद्दे मालावर धाड टाकली असता सदर 2 लाख 82 हजार रुपयांचा अवैध देशीदारू साठा असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
आज दिनांक 4 मे 2021 रोजी मा. पोलीस अधिक्षक मा. अपर पोलीस अधिक्षक मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मा. पोलिस निरिक्षक श्री. रविंद्र शिंदे सा. यांचे मार्गदर्शनामध्ये मौजा मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात पाहिजे असलेले आरोपी नामे दिपक दुधे, व राष्ट्रपाल गेडाम, दोन्ही रा. मोटेगाव, ता. चिमूर यांनी अवैधरीत्या देशी दारू विक्रिचे उद्देशाने लपवून ठेवली असल्याचे खात्रीशीर मुखबिराचे खबरेवरुन दारूबंदी अंतर्गत कार्यवाही केली असता ११ नग खर्ड्याच्या खोक्यात प्रत्येकी ४८ नग प्रमांणे ५२८नग कोकण देशी दारु संत्रा ९९९,प्रती २५०रु. प्रमाणे. किं.१,३२,०००रु., तीन नग प्लास्टिक चुंगळीत ३०० नग प्रमाणे ९०० नग प्रत्येकी ९० मिली. मापाच्या रोकेट देशी दारु संत्रा प्रती १५०रु. प्रमाणे १,३५,०००रू. तसेच एका खर्ड्याचे खोक्यात १०० नग प्रत्येकी ९०मिली. मापाच्या रोकेट संत्रा देशी दारुने भरलेल्या, किं. १५,०००रु. असा एकूण २,८२,०००रु.चा माल मिळून आल्याने या मोठ्या कारवाई ने नेरी पोलीस चौकीचे उपनिरीक्षक राजु गायकवाड यांचे लागोपाठ कारवाई सत्र सुरूच असल्याने अवैध देशी विदेशी दारू तस्करांचे मात्र धाबे दणाणले आहे.
या नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध रितसर दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले असून सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी येथील पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड, NPC/20, दिनेश सूर्यवंशी,PC/2565, सचिन साठे,चालक PC/808, शरीफ शेख, सैनिक 1396, 1470 यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.