IPL 2021: कोरोना प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी आयपीएल स्पर्धा रद्द करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे