Homeचंद्रपूरराजुरानागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाला हरवने शक्य-आमदार सुभाष धोटे.

नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाला हरवने शक्य-आमदार सुभाष धोटे.

राजुरा (ता.प्र) :– समाज मंदिर, रामनगर कॉलनी, राजुरा येथे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीकरणाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, सध्या देशात, चंद्रपूर जिल्ह्य़ात तसेच राजुरा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहेत. अनेकांना नुकसान सहन करावे लागले आहे. ते कधीही भरून निघणारे नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी लाकडाऊनचे आणि शासकीय, प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून आपल्या आणि आपल्या परिवारातील कुटुंबियांची काळजी घ्यावी सोबतच शासनाने लसीकरण मोहिम अधिक व्यापक आणि गतीमान केली आहे. सर्वांनी लसीकरण करून, सर्व ती खबरदारी घ्यावी म्हणजे कोरोनाला हरवने सहज शक्य होईल.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, नायब तहसीलदार, परिचारिका, तथा नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!