चंद्रपुर जिल्ह्यात बीडीओकडून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग…

0
938

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून पंचायत समिती सिंदेवाही येथील गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या भयावह परिस्थितीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी तथा अधिकारी सेवा प्रदान करीत आहेत. असे असताना त्यांचीच अवहेलना करण्याचा प्रकार सिंदेवाही तालुक्यात घडला आहे.

Advertisements

गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांना स्वत:च्या कार्यालयात बोलावून त्यांचा विनयभंग केला व मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दाखल केली.

त्या अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नेरकर करीत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here