वरोरा :- शहरातील शिवाजी वार्ड येथील मृतक नामे गणेश रमेश हिरादेवे वय २० वर्ष रा. शिवाजी वॉर्ड वरोरा याचा राहत्याघरात गळ्याला ओळणीने फास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि.२७ एप्रिल रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे.
नेहमीप्रमाणे गणेश हा मोबाईल दुकानात कामाला गेला लॉकडाऊन असल्याने तो साडे अकरा वाजता घरी आला मृतकाची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेली असता मृतकाने घराचे दोन्ही दरवाजे बंद करून गळफास लावल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे, मात्र शरीरावर जखमा असून त्यातून मोट्या प्रमाणात रक्त गेल्याने ही आत्महत्या की हत्या असा संशय व्यक्त केला जात आहे आई व मृतक मुलगा दोघेच राहत होते., घटनास्थळी पोलिसांनी येवुन पंचनामा केला , ही आत्महत्या आहे की हत्या याचा पुढील तपास वरोरा पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Advertisements