दिपक साबने,जिवती*
जिवती तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिखली बु. येथील सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ बचत गटाला मिळालेल्या शासकीय योजनांच्या निधीमधून लाखो रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी चिखली बु. चे ग्रामसेवक दिलीप ताकसांडे आणि ग्रामसंघ बचत गटाचे काम पाहणाऱ्या आम्रपाली मनोहर अलोने ह्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांना अटक केली आहे.
सविस्तर पाटण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिखली बु. येथील सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई जंगु नैताम यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की या बचत गटाचे अॉपरेटर म्हणून काम करत असलेली आम्रपाली मनोहर अलोने हिने चिखली बु. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप ताकसांडे यांना हाताशी धरून शासनाकडून मिळणारा लाखो रुपयाचा निधीची परस्पर विल्हेवाट लावली आहे त्यामुळे या दोघांवर कलम ४०७,४२०,३४ भा.दं.वि गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पुढे आलेल्या प्राथमिक माहिती नुसार सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ बचत गटाला शेळीपालन योजनेअंतर्गत दि.०८/०८/२०१० रोजी ग्रामसंघाच्या खात्यावर १७,८८,०००( सतरा लाख अठ्ठयांशी हजार रुपये) जमा झाले होते तेव्हा आम्रपाली हिने गटातील पंचवीस महिलांचे अर्ज भरून प्रतेकी १००००( दहा हजार रुपये) जमा करून सत्तरा महिलांना प्रतेकी अकरा शेळ्या घेऊन दिल्या तर उर्वरित महिलांना शेळ्या देण्यात आल्या नाही तर शेळ्यांचे पैसे सुध्दा देण्यात आले नाही बॅंक स्टेटमेंट बघितले असता बरीच माहिती उघडकीस आली असून आम्रपाली हिने दि. २७/१२/२०१९ रोजी सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ बचत गटाच्या खात्यामधून ५९००००( पाच लाख नव्वद हजार रुपये) वैशाली गेडाम हिच्या खात्यात जमा करून
दि.२८/१२/२०१९ रोजी वैशाली गेडाम हिच्या खात्यावरून ५९०००० रुपये काढून वैशाली गेडाम हिच्या खात्यात ८०००० रुपये जमा केले आणि उर्वरित ३७०००० (तिन लाख सत्तर हजार) रुपये आम्रपाली हिने आपल्या मुलीच्या सुरेखा मनोहर अलोने हिच्या खात्यात जमा केले तर ग्रामसंघासाठी दान दिलेली जागा आम्रपाली हिने ग्रामसेवक दिलीप ताकसांडे यांना हाताशी धरून आपल्या नावावर केली आहे.
सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ बचत गटाच्या लाखो रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी आम्रपाली मनोहर अलोने आणि ग्रामसेवक दिलीप ताकसांडे यांच्या वर गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर हजर करण्यात आले असता आम्रपाली हिला पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर ग्रामसेवक दिलीप ताकसांडे यांना जामीन देण्यात आला असून पुढील तपास पाटण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निलम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राकेश वाकुलकर करीत आहे.
चिखली बु. येथे महिला ग्रामसंघात लाखो रुपयांची अफरातफर…ग्रामसेवक ऑपरेटर महिलेला अटक…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements