Homeचंद्रपूरगोंडपिंपरीधामनपेठ जंगल कामगार सह.संस्थेच्या सचिवाची हकालपट्टी...#मास्टर माईंड खेमचंद गरपल्लीवार

धामनपेठ जंगल कामगार सह.संस्थेच्या सचिवाची हकालपट्टी…#मास्टर माईंड खेमचंद गरपल्लीवार

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
सुमारे पंचवीस वर्षापासून भोळ्या भाबड्या आदिवासी संचालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपला स्वार्थ साधून ,मनमानी कारभार करणाऱ्या संस्थेच्या सचिवाची संस्थेच्या बैठकीत एका ठरावाद्वारे हकालपट्टी करण्यात आली.सामाजिक ,राजकीय कार्यकर्ते खेमचंद गरपल्लीवार यांचा याकामी प्रमुख पुढाकार होता.
धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्था र नं 8371 ही गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.आजमितीस या संस्थेचे अडीचशेच्या वर सभासद संख्या आहे.
सदर संस्थेत आदिवासी समाजातील बहुसंख्य सदस्य ,संचालक आहेत.सुमारे 1995पासून संस्थेचे सचिव म्हणून श्री वासुदेवराव सातपुते हे कामकाज करत आहेत.आज त्यांचे वय 75 वर्षाच्या पुढे आहे.
तरीही ते आपल्या पदाला चिटकून आहेत.!त्यांनी सहकारी संस्थेच्या नियमानुसार कधीही कारभार केला नाही.भोळ्या भाबड्या आदिवासी संचालकांच्या अल्पशिक्षित पणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांनी आपला स्वार्थ साधला आहे.सातपुते यांनी अक्षरशः मनमानी कारभार चालवला होता.
गोंडपिपरी येथील धाबा क्रॉसिंग वर संस्थेचे गाळे आहे,ते गाळे भाड्याने देताना त्यांनी किरायेदारांचे करारनामें केले नाहीत.
संस्थेला वनविभागाचे 1कोटी 16लाख एकाहतर हजार पाचशे एक्क्यांशी रु देने आहे .इतके मोठे कर्ज असल्याने संस्थेला वनविभागाकडून मागील सुमारे पंचवीस वर्षापासून कूपकामे बंद झाली आहेत .त्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे .सचिव .म्हणून सातपुते यांनी संस्थेच्या आर्थिक हितासाठी काहीच पाऊले उचलली नाहीत .
त्यांनी संचालक मंडळाच्या सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा नियमानुसार घेतल्या नाहीत .
संस्थेचे सचिव वासुदेवराव सातपुते यांच्यावर अकार्यक्षमतेचा आणि मनमानी कारभार करण्याचा आरोप ठेवून त्यांना सदर संस्थेच्या 26एप्रिल रोजी झालेल्या सभेत ठराव क्र 2अन्वये सचिव पदावरून दूर करण्यात आले आहे .संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्ष श्रीमती मंदाबाई दत्तू कुळमेथे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या .इतर संचालकही या सभेला हजर होते.
धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेत जे सत्तापरिवर्तन झाले त्यात सामाजिक कार्यकर्ते खेमचंद गरपल्लीवार यांनीच पुढाकार घेतला आहे .मास्टर माईंड तेच आहेत.
मनमानी कारभार करणारे अध्यक्ष ,आणि सचिवाची उचलबांगडी करण्यात आल्याने आदिवासी समुदायातील सर्व सभासद आणि संचालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!