अपघातातील जखमी पोलीस शिपायाचे 9 दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर उपचारादरम्यान निधन…

0
1562

आष्टी- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई गजानन ठाकूर वय (36 )वर्ष अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील दवाखान्यात उपचार चालू असताना आज दुःखद निधन झाले.

Advertisements

12 एप्रिल च्या मध्यरात्री नाकाबंदी साठी आष्टी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई गजानन ठाकूर यांना गोंडपीपरी कडून येणाऱ्या मिनी ट्रॅक ने जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले.

Advertisements

त्यांना लगेच चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.परंतु त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना नागपूर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.परंतु अखेर 9 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पोलीस शिपायाचे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आष्टी पोलीस स्टेशन मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यतील गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा बराच आप्त परिवार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here