HomeBreaking Newsप्राथमिक शिक्षक विजय कारखेले यांचेकडून पाच कुटुंब दत्तक...#लॉक डाऊन च्या कालावधीत पाच...

प्राथमिक शिक्षक विजय कारखेले यांचेकडून पाच कुटुंब दत्तक…#लॉक डाऊन च्या कालावधीत पाच कुटुंब दत्तक घेण्याची राज्यातील पहिलीच घटना…

प्रशांत शाहा विदर्भ ब्युरो चीफ
अहमदनगर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शासनाने राज्यात लॉकडावून जाहिर केले. या बंदमुळे हातावर पोट भरणारांची पंचाईत झाली. अशा अडचणीच्या काळात गोर- गरिबांना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य असल्याचे मानुन अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवन वाडी येथील आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी पाच कुटुंब दत्तक घेवून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.

देशात कोरोनाचा कहर चालू असताना राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील अनेक गावात कोरोना रूग्णांची संख्या दिवसें- दिवस वाढत आहे. यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने राज्यात १४ दिवसांचे लॉकडावून केले. या लॉकडावूनमुळे मात्र हातावर पोट भरणारांची उपासमार होवू लागली. काम केले तर पोटाला भाकर अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ अनेक गोर – गरीब कुटुंबावर आली आहे. आपण समाजाचे काही -तरी देणे लागतो या भावनेने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील ५ कुटुंब दत्तक घेवून त्या कुटुंबांना तांदुळ, गहु, तेल, मीठ, साखर, चहापुडा, साबण आदि वस्तु देवून कारखेले गुरुजी यांनी समाजापुढे तसेच समाजातील नोकरदारवर्गापुढे एक वेगळा आदर्श ठेवला अशा कठीण काळात हीच वेळ आहे समाजाची उतराई करण्याची, तसेच शासकिय यंत्रणेला मदत करण्याची असे समजुन प्रत्येक नोकरदाराने फक्त ५ गोर- गरीब कुटुंब दत्तक घेतले तर शासनाचा भार हलका होईल, आणि लॉकडावून वाढवून कोरोनास हद्दपार करता येईल. डॉक्टर्स, नर्स, पोलिस, पत्रकारासह अनेकजण आपला जिव धोक्यात घालून समाजाला या महामारीपासून वाचविण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या खांद्याला -खांदा लावून काम केल्यास आपणासही खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धा होण्याची वेळ आली असल्याचे मत विजय कारखेले यांनी व्यक्त केले. विजय कारखेले यांनी संपूर्ण लोकल आमच्या कालावधीसाठी या कुटुंबांना दत्तक घेतल्यामुळे एखाद्या प्राथमिक शिक्षकांनी लोक जाऊन च्या काळात गोरगरीब कुटुंबांना दत्तक घेण्याची ही राज्यातील पहिलीच घटना झाली आहे आदर्श शिक्षक विजय कारखेले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच या उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!