विदर्भ ब्युरो चीफ प्रशांत शाहा
गडचिरोली:
पोमके रेगडी येथे शेवगा शेती लागवड व प्रशिक्षण मेळावा पार पडला. दिनांक 21/04/2021 रोजी पोमके रेगडी येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिलडा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा मेळावा पार पडला. परिसरातील अनेक शेतकरी मेळाव्यास उपस्तित होते. मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेवगा रोपांचे वाटप करून कृषी सहायक श्री होबडे व खोब्रागडे यांनी शेवगा शेती वर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले.सदर मेळाव्यास पोनि चामोर्शी श्री शेवाळे साहेब, शिंदे साहेब, पो. उप नी. श्री.सरोवर साहेबप्रभारी रेगडी , पो. उप. नी श्री शिंब्रे साहेब, पोह /कोपरे, व इतर अंमलदार व गावातील नागरिक उपस्तित होते…






