HomeBreaking Newsनाशिक हादरले! नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात आँक्सिजन पुरवठा खंडीत होऊन २२करोना रुग्णांचा...

नाशिक हादरले! नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात आँक्सिजन पुरवठा खंडीत होऊन २२करोना रुग्णांचा जागीच तडफडून मृत्यू…

नाशिक: नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात आँक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे आँक्सिजन पुरवठा खंडीत होऊन २२करोना रुग्णांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.गँस गळतीनंतर काही रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलविण्यात आले आहे.तर काही जणांना वेळीच आँक्सिजन न मिळाल्याने त्यांचाही मृत्यू होऊन मृतांचा आकडा वाढला आहे.

दुर्घटना घडली तेव्हा या रुग्णालयात १३१ रुग्ण दाखल होते.तर सुमारे २० ते २५ करोनाबाधित रुग्ण हे रुग्णालयाच्या आवारातच दाखल होते.मृताचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर व्यक्त केली आहे.

आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान गँसच्या प्रेशरमुळे आँक्सिजन टाकीचे नोझल तुटल्याचा दावा यंत्रणेने केला आहे.नातेवाईकांचा आरडाओरडा ,हदय पिळवटून टाकणारा हंबरडा,यामुळे घटनास्थळी एकच कल्लोळ माजला होता.आँक्सिजन गळती सुरु असताना परिसरात धुरासारखे चित्र निर्माण झाल्याने सुमारे दोन ते अडीच तास उपस्थितांना काहीच समजून येत नव्हते.

काही नातेवाईक अधिकारी वर्ग व पत्रकार मंडळी धावून गेल्याने तांत्रिक पथकाच्या मदतीने दीड तासानंतर रुग्णालयाचा आँक्सिजन पुरवठा हळूहळू पुर्वपदावर आला.जिल्हा रुग्णालय व इतर जिल्ह्यातून आँक्सिजनचे टँकर मागवून ते या रुग्णालयाच्या टाकीत सोडण्याचे काम सुरु होते,आँक्सिजन टाकी व यंत्रणेची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप शिवसेनेने केला असून,दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.सुरुवातीला ११ कोरोना रुग्णांचाच बळी गेल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली.नंतर मात्र हा आकडा २२ झाल्याचे सांगण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!