Advertisements
Home चंद्रपूर गोंडपिंपरी भंगाराम तळोधी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार...नळाला दूषित पाणी; नालेसफाई नाही...

भंगाराम तळोधी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार…नळाला दूषित पाणी; नालेसफाई नाही…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) भं तळोधी येथील काही वॉर्डात नळाद्वारे दूषित ,अळ्यामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे ,अनेक वर्षापासून नाल्यांची सफाई झालेली नाही .यामुळे नागरिकांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Advertisements

ग्रामपंचायत सदस्य सहदेव रेड्डी ,माजी सरपंच विठोबा बावणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी यासंदर्भात वार्तालाप करताना सांगितले ,भं तळोधी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे .ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वॉर्ड क्र चार मध्ये ग्रामपंचायतच्या नळाद्वारे अत्यंत दूषित ,अळ्यामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे.गत वर्षापासूनची ही समस्या आहे .माजी सरपंच विठोबा बावणे यांनी तेव्हा सदर समस्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावरही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही.
काही वॉर्डातील नाल्यांची सफाई सुमारे पाच वर्षापासून झाली नाही. त्यामुळे नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे !
दिनकरराव आईंचवार यांच्या दुकानापासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत च्या रस्त्यावर सांडपाणी येते.समस्याग्रस्त वॉर्ड विद्यमान उपसरपंच यांचा आहे .तथापि त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे सांगण्यात आले.वॉर्ड क्र 4च्या समस्या नागरिकांनी वॉर्ड क्र 5च्या सदस्याकडे मांडल्या आणि हे जागृत सदस्य समस्या माध्यमाकडे मांडत आहेत.
‘जल ही जीवन है ‘ही वस्तुस्थिती असताना भं तळोधीत अत्यंत दूषित,अळ्यामिश्रित पाणी पुरवठा होत आहे ,पाच ,पाच वर्षापासून नाल्यांची सफाई नाही ,सांडपाणी रस्त्यावर येत आहे ..यामुळे नागरिकांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाकडून भं तळोधी ग्रामपंचायतला गत वर्षी 20लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला.’अस्वच्छतेसाठीचा’ हा पुरस्कार होता का ?असा उपरोधिक सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला .
सदर वार्तालाप प्रसंगी माजी सरपंच विठोबा बावणे ,ग्रा पं सदस्य सहदेव रेड्डी ,तालुका भाजप अध्यक्ष बबन निकोडे ,सुदर्शन बावणे ,सुभाष भस्की ,खुशाल ताजने हजर होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

रस्त्यावरच रोवणी करायची का? लाठी वासीयांचा स्थानिक प्रशासनाला प्रश्न…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर:  हा रस्ता आहे 'स्वच्छ लाठी सुंदर लाठी' चा फलक गावाच्या पुढे लागणाऱ्या लाठी(गोंडपीपरी) या गावाचा. . . ऐन बसस्थानकाला लागून...

भारतीय जनता युवा मोर्चा धाबा मित्र परिवारतर्फे धाबा पोलीस स्टेशन येथील ठाणेदारांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार…

शरद कुकुडकार गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी संत नगरी श्रीक्षेत्र धाबा उप -पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे साहेब यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्धल व उत्तम कामगिरीची...

उपपोलीस स्टेशन धाबा यांची कौतुकास्पद कामगिरी…# भारतीय जनता युवा मोर्चा धाबा मित्र परिवारतर्फे ठाणेदारांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार…

शरद कुकुडकार (गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी) गोंडपिपरी: संत नगरी श्रीक्षेत्र धाबा उप -पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे साहेब यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्धल व...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण…विजेत्यांचा सत्कार – आ.वडेट्टीवार यांची सपत्नीक उपस्थिती

सिंदेवाही:  युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही - लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे...

मोबाइलसाठी मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव…#कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

चंद्रपूर : वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!