गोजोली परिसरात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार..

0
645
Advertisements

शेखर बोनगीरवार (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील गोजोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 150 मध्ये दिनांक 3/ 4 /2021 रोज शनिवार नऊ वाजता वाघाने बैलावर हल्ला चढविला यात श्री. भाऊजी पोचू तांगडे मुक्काम चेक दुबारपेठ यांच्या मालकीचे अंदाजित 30000 किमतीचे बैल ठार झाले. शेती नुकसानीने आधीच विवंचनेत अडकलेल्या या गरीब शेतकऱ्याच्या बैलाच्या जोडीच्या एका बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील शेती हंगामा साठी मोठा पेच निर्माण झाला असून चेक दुबारपेठ येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे बैलाचा योग्य मोबदला वनविभागाकडून लवकर मिळावा ही अपेक्षा वर्तविली आहे.
चौकशी अधिकारी म्हणून पी.पी.ढाले क्षेत्र सहाय्यक अधिकारी गोंडपीपरी व एस. एस. नैताम वनरक्षक गोजोली यांनी तपास केला असून, सदर परिसरातील नागरिकांना जंगलात कुणीही जाऊ नका, अशी सूचना देण्यात आली.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here