छत्तीसगड: नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद…

0
822

छत्तीसगड:- एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असता दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून हल्ले सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापुर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे. या चकमकीत 12 जवान जखमी झाले असून जखमी जवानांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्तीसगडच्या जंगलात माओवाद्याच्या हल्ल्यात पाच जवान शहीद आणि काही जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या चकमकीत एक माओवादी ठार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापुर जिल्हयात जुनागडच्या जंगलात गेल्या दोन तासांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू आहे.

बिजापुर आणि सुकमा जिल्हयाच्या सीमेवर ही चकमक अजुनही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here