धक्कादायक! पैश्याच्या वादातून ट्रक ड्रायव्हरची निर्घुन हत्या; आरोपी सहकारी कंडक्टर…     

0
999

नितेश खडसे (जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली)

गडचिरोली:- धानोरा येरकड मार्गावर सालेभट्टी गावाजवळ काही तांत्रिक बिघाडामुळे मागिल आठवड्यापासुन उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या ड्राइवरची त्याच्याच सहयोगी कंडक्टर कडून आज दुपारी 2 वाजताचे सुमारास चाकूने हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
       ट्रेलरच्या मालकाने बऱ्याच प्रतिक्षेनंतर ड्राइवरच्या बैंक खात्यात आज पैसे टाकले. त्या पैशांच्या मागणीच्या वादाचे रूपांतर हत्येत झाली. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्नाराज एम. मारिया मिशेल रा. कालकाड तमिलनाडू असे मृतक ड्राइवरचे नाव असुन पोनमडसामी दशमुर्ती रा. उत्तीरामुथ्थानपत्ती असे हत्या करणा-या कंडक्टरचे नाव समजते. 
ट्रक हा मागील 6ते 7 दिवस पासून सालेभट्टी गावा जवड उभा होता. त्यांना समोर छत्तीसगढ ला जायचे होते पण एकाच ठिकाणी उभा असल्याने त्यांचेकडील पैसेही संपले होते. त्यात आज ट्रेलरच्या मालकाने ड्राइवरच्या बैंक खात्यात काही रुपये जमा केले. यातील काही पैसे कंडक्टरने मागितल्यावरून विवाद सुरू झाला आणि त्यात कंडक्टर ने ड्राइवरवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या वादात ड्राइवरच चाकू घेऊन कंडक्टरवर चालून गेला आणि यातून आत्मसंरक्षण करताना झालेल्या प्रतिक्रियेत ड्राइवरला प्राण गमवावे लागले. असे कंडक्टर कडून सांगण्यात आल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान पोलीसांनी घटनेची नोंद घेऊन कंडक्टर ला ताब्यात घेतले असुन ड्राइवरचे पार्थिव शवविच्छेदनासाठी धानोरा ऊपजिल्हा रूग्णालयात पाठविले आहे. पूढील चौकशी धानोरा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here