शब्दांकूर फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल उद्या होणार घोषित…

0
151

चंद्रपुर; शब्दांकूर फाऊंडेशन, चंद्रपूर मार्फत मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरी करण्यात येते.मराठी भाषा ही प्राचीन भाषा असून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे त्यामुळे मराठी भाषा केंद्रीभूत मानून प्राथमिक गट इयत्ता ४ ते ७ वी व माध्यमिक गट इयत्ता ८ ते १२ वी साठी पोस्टर स्पर्धा,निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेला जिल्ह्यातून तसेच बाहेर जिल्ह्यातून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोस्टर स्पर्धेचा विषय गौरव मराठीचा हा दिलेला होता त्यात प्राथमिक गटातून ४३ व माध्यमिक गटातून २९ स्पर्धक होते.निबंध स्पर्धेचे प्राथमिक गटाचा विषय “मायबोली मराठी” यात ७० स्पर्धक तर माध्यमिक गटाचा विषय “मराठी भाषेचे संवर्धन-काळाची गरज” या स्पर्धेसाठी ३५ स्पर्धक आलेले होते त्याचसोबत प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक गटातून २४ तर माध्यमिक गटातून १९ स्पर्धक उपस्थित होते.या तिन्ही स्पर्धेमध्ये सहभागी अधिक असल्याने निकाल विलंबाने ४ एप्रिलला रविवारी घोषित करण्यात येत आहे.
शब्दांकूर फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजयी उमेदवाराला सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र घरपोच देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना दिले जाणारे सन्मानचिन्ह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सरकार्यवाहक तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.सुधाकर अडबाले यांच्या सौजन्याने देण्यात येत आहे.स्पर्धेचे आयोजन,नियोजन दुशांत निमकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,तानाजी अल्लीवार,राकेश शेंडे,मनोहर आंबोरकर,प्रा.ललिता वसाके, सौ उषा निमकर,प्रशांत खुसपुरे,आशिष ढवस या सर्वांच्या सहकार्याने झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here