Advertisements
वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. येथील मंगेश गणपत घोडमारे हा गेल्या दोन महिन्यांपासून बेला येथे ऑटोमोबाइल्सचे दुकान लावून व्यवसाय करीत होता. शुक्रवारी शेगाव येथून स्वतःच्या दुचाकीने तो बहिणीच्या गावाकडे निघाला होता.
Advertisements
परंतु, बहिणीच्या घरी न पोहोचता रस्त्यातच एका शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याच्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे मानसिक संतुलन ढासळल्याने सदर युवकाने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.
Advertisements
Advertisements