आणि…नगर प्रशासनाच्या कचरा वाहतुकीच्या वाहनाचे फाडले चालान…ठेकेदारांनी परवाना असल्याची खात्री न करता वाहन चालक म्हणून केली नियुक्ती.

0
438

गोंडपिपरी: येथील नगर पंचायत अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांचा मुद्दा सद्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे.काही प्रलंबित मागण्यांना घेऊन मार्च महिन्यात अकरा दिवस उपोषण करण्यात आले.ठेकेदार इटनकर आणि कामगार मधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येते.ठेकेदारांनी नियुक्त केलेल्या सुपरवाइजर कडून देखील अत्याचार होत असल्या बाबतची तक्रार कामगारांनी स्थानीक पोलिस ठाण्यात नोदवले असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

Advertisements

अधिक माहिती नुसार नेहमी प्रमाणे सफाई कामगारांनी कामावर रुजू होण्यासाठी ठरलेल्या नियोजित ठिकाणी उपस्थित झाले.परंतु त्या ठिकाणी जुन्या आणि नेहमीच्या कामगारांना डावलून नवीन लोकांना कामावर घेण्यात आले.नगर पंचायत स्थापन झाल्यापासुन अविरत काम करत असलेल्या २७ कामगारांना काल दिनांक १८/३/२०२१ ला कोणतीही पूर्व सूचना न देता तडकाफडकी कामावरून काढून घेतले.हा आमच्यावर अन्याय आहे.पाच वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत असताना आज आमच्यावर ठेकेदार इटनकर आणि सुपर वाइजर तिरूपती झाडे यांनी संगण मत करून उपासमारीची पाळी आणली.अश्या भावूक शब्दात कामगारांनी आपली व्यथा कथित केली आहे.

Advertisements

काल सकाळी सहा वाजता पासून तर बारा वाजेपर्यंत गांधी चौकात कामावर घेतील या आशेवर कामगार प्रतीक्षा करीत बसले होते.अश्या परिस्थितीत कोणीच त्यांच्या मदतीला धावून आले नाही.संयमाचा बाण अनावर होताच कामगारांनी वाहतूक पोलिसांना संपर्क केला आणि नगरातील कचरा वाहतुकीच्या वाहन चालकाविषयी माहिती दिली.माहिती ला गांभीर्याने घेऊन वाहतूक पोलिस कर्मचारी श्री.मत्ते यांनी कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनाच्या मागावर निघाले.वाहनाला पकडुन चौकशी केली असता,वाहन चालवणाऱ्या कडे परिवहन अधिकाऱ्यांचे अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले.दरम्यान पोलिसांनी वाहने चालान केली.

नगर पंचायत कडून ठेका अद्यावत करतांना ठेक्यात संपूर्ण नियमांचा उल्लेख केला असतो.परंतु नियमाला कोणी वाचला असेल असे दिसून येत नाही. जनतेला नियम सांगणाऱ्या प्रशासनाकडूनच नियमांचा उल्लंघन होत असेल तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा ठेवायची असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. असले कार्य करून नियम कोण पायदळी तुडवीत आहेत ?अगर प्रशासनाच्या गाड्या चालाण होत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे. काल घडलेल्या या प्रकरणाची चर्चा गावात चांगलीच रंगत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here