अरे बापरे! असे झाल्यास कोरोना कसा थांबणार…? #झरी तालुक्यातील मुकुटबन मध्ये सोशल डिस्टसिंग चा फज्जा

0
1160

यवतमाळ: झरी तालुक्यातील मुकुटबन हे गाव व्यापारी दृष्टीकोनातून मोठी बाजारपेठ आहे. अश्यातच यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तर तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी आव्हाहन करत आहे की, मास्क लावा, सोशल डिस्टन ठेवा, नियमितपणे सॅनिटायझर वापरा अश्या सूचना तालुका प्रशासन वेळोवेळी देत आहे. पण शासनाच्या नियमाला न जुमानता खुलेआम मिरवणूक काढण्यात आली.

जिल्हाधिकारी साहेबांकडुन लग्न संभारभ व इतर समारंभा करिता फक्त 50 लोकांची मर्यादा देण्यात आली. मात्र मुकुटबन मध्ये वेगळेच चित्र पहावयाला मिळाले. सध्या कोरोना विषाणू वेगाने पसरायला सुरवात झाली आहे. दुसरी लाट देखील आली आहे. पण मुकुटबन मध्ये ना पोलिसांचा धाक ना ग्राम समितीचा धाक कारण गावातील लोकांनी निवडून दिले मेम्बर हे यात लोकांना हात जोडून स्वतः फिरत असताना दिसत आहे आणि असे पण दिसून येत आहे की गावातील प्रशासकीय अधिकारी झोपले दिसत आहे.

एकीकडे महाराष्ट्रतील दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बंदी आणली आणि हे मिरवणूक काढायला कोणी परमिशन दिली हा प्रश्न उभा आहे. आता कोण कोणावर कारवाई करतील हे पण पाहणे तितकेच महत्वाचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here