HomeBreaking Newsवरोरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रावर धाडसी दरोडा..6 लाखांची रोकड आणि 10 तोळे...

वरोरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रावर धाडसी दरोडा..6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने लंपास…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने लंपास केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्थानिक नागरिकांन महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली. त्यामुळे गावकऱ्यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. तसंच या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडून असल्याचे दिसून आले. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान कामाला लावण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. दरोडेखोरांना माग काढण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!