तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात जागतिक समाजकार्य दिनाचे ऑनलाईन आयोजन…

0
448

-सुरज पि. दहागावकर (उपसंपादक)

नागपूर: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स या जागतिक समाजकार्य संघटनेच्या पुढाकारामुळे व यूएनच्या मान्यतेने दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी जागतिक समाजकार्य दिवस जगभर साजरा केला जातो. यावर्षी १६ मार्च रोजी जागतिक समाजकार्य दिन तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात ऑनलाईन साजरा केला जात आहे.

सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती धर्माधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली होत असून कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निर्मला निकेतन, कॉलेज मुंबई च्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. हेलन जोसेफ मॅडम उपस्थित राहणार आहेत. सोबतच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित असतील.

बदलत्या काळानुसार समाजकार्याचे स्वरुप देखील बदलत असून आता शिक्षण सुरू असतानाच समाजकार्य करणाऱ्यांचे प्रमाणही समाजात वाढताना दिसत आहे.

जागतिक समाजकार्य दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिपांकर भोजने, ऑरा गेब्रिएल, स्वर्णिमा कमलवार, सुरज दहागावकर, रोहिणी पवार, श्वेता मडावी, मुकुल पराते, प्रीतम गग्गुरी, सिद्धांत ढोणे यांनी केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here