प्रशांत शाहा विदर्भ ब्युरोचिफ
चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील आष्टी मार्गावर मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून संपूर्ण रस्ता अरुंद झाले आहेत. त्यात सोनापूर जवळील वळणावर असलेल्या ढाबा जवळ अनेक जड वाहन उभे राहत असतात.
या उभ्या वाहनांमुळे अनेकदा येथे अपघात झाले आहेत. सोनापूर येथील कुमारी श्रवंती संतोष सातपुते वय वर्ष 15 या शाळकरी विद्यार्थिनीचा पाय तुटल्याची घटना घडली आहे.
व संतोष सातपुते हे पण गंभीर जखमी झाले आहेत.
चामोर्शी वाहतूक पोलीस याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अश्या वाहन धारकांवर कारवाही करावी अशी मागणी सोनापूर परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
Advertisements