ट्रकची बसला धडक; चार प्रवासी गंभीर जखमी…

0
374

प्रतिनिधी बंटी गेडाम

चंद्रपूर:- वणी येथून घुग्घुस मार्ग चंद्रपूरकडे जाणारी बस क्रमांक एमएच १४ बीटी ०६८२ ही एसटी घुग्गुस बस स्थानकासमोरील थांबवली असता मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एपी ३५ व्ही ९६१९ या ट्रकने बसला आज सोमवारी दुपारी २:३० वाजताचे दरम्यान जबर धडक दिली.

यामध्ये भिवापूर निवासी 50 वर्षीय सिद्धार्थ साठे , चंद्रपुरातील 20 वर्षीय युवती तृप्ती कन्नाके, शेणगाव येथील 70 वर्षीय जिजाबाई पाचभाई व घाटंजी येथील 32 वर्षीय रवींद्र चलकेलवार यांना अपघातात गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक दत्ता रामाजी किन्नाके ४३ रा. नरसाळा ता. मारेगाव यांनी ट्रक चालका विरुद्ध तक्रार दाखल केली असून ट्रक चालक फरार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here