राजुरा तालुक्यात दारूचा अडीच लाख रुपयांचे मुद्देमालासह देशी दारू जप्त…

584

बल्लारपूर : गडचांदूर वरून कढोली मार्गे चंद्रपूरला एका वाहनातून दारूची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राजुरा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे पोलीस हवालदार रवी नक्कनवार,पोलीस हवालदार किशोर तुमराम हे या मार्गावर पाळत ठेऊन होते दरम्यान सकाळी साडे पाच वाजे दरम्यान गडचांदूर कडून येणाऱ्या एम एच 34 क 3799 क्रमांकाच्या कारचा संशय आल्याने त्याला थांबवून झडती घेतली असता त्या कार मध्ये 1 लाख रुपये किमतीचे 90 मिली ची 1हजार नग बाटल देशी दारू आढळून आली त्यावरून सदर कार चालक अयफाज अली अल्ताफ वय 22 वर्ष राहणार पठाणपुरा वार्ड ,चंद्रपूर येथील यास पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला या कारवाईत दीड लाख रुपये किमतीची कार आणि 1 लाख रुपयांची देशी दारू असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजासिंग पवार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहाद्दूरे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सतीश गोडसे यांचे नेतृत्वात पोलीस हवालदार रवी नक्कनवार,किशोर तुमराम यांनी केली.