ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे जागतिक महीला दिन साजरा…

0
265
Advertisements

चंद्रपूर: धर्मादाय आयुक्त,सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चंद्रपुर या ठिकाणी जागतीक महीला दिनांचे औचीत्य साधुन ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला ही अबला नसून ती कर्तुत्ववान आहे, ती आज कोणत्याही क्षेत्रात मागे नसून आज महिला प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी झेप घेतली आहे.

चूल आणि मूल या पलीकडेही महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी असलेल्या मा. डबाले, रॉय मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमात “सन्मान गृहीणींचा” हा महत्वपुर्ण कार्यक्रम आयोजित करून महीलावर्गांना सन्मानपञ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.

Advertisements

यावेळी प्रामुख्याने कार्यालयातील प्रमुख श्रीमती.मा.ढबाले मँडम, श्रीमती.मा.रॉय मँडम आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळाचे सहकारीवर्ग अशोक अंबागडे, सौरभ मादासवार , प्रशील भेसेकर ,श्रृती अंबागडे यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here