वरुर रोड येथे जागतिक महिला दिन साजरा…

0
237

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)र

Advertisements

वरूर: जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात बेबीनंदा बोरकर, सोनी निरांजने, तनिक्षा धानोरकर ,समीक्षा मोडक, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक विशाल शेंडे, वनिता लाटेलवार यांनी आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, स्त्रियांनी लढायला शिकल स्त्री कमजोर नाही तर कर्तुत्ववान, धाडशी आहे. महिला आज ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे, नाव लोकिक करत आहे हे सर्व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळे, संघर्षामुळे होय. प्रत्येक स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवला पाहिजे. असे सांगून गावातील प्रतिष्ठित महिला, शालेय विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Advertisements

 

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here