चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 696 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 975 झाली आहे. सध्या 322 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 14 हजार 961 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 89 हजार 620 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 75 वर्षीय पुरूषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 399 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 22 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर दोन, नागभिड दोन, सावली तीन, गोंडपीपरी एक, राजुरा एक, चिमूर एक, वरोरा एक व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Advertisements
गत 24 तासात एका मृत्यूसह 22 कोरोनामुक्त व 22 पॉझिटिव्ह…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements