सकमुर सरपंचाचा मनमानी कारभार…प्रशासनाने जप्त केलेल्या रेतीने काँक्रेट रोडचे बांधकाम, कारवाईची मागणी…

0
765

-सुनील डी डोंगरे (कार्यकारी संपादक)
ग्रामपंचायत कमेटीची मंजुरी न घेता प्रशासनाने जप्त केलेल्या रेतीचा वापर काँक्रेट रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करून सकमुर सरपंचाने मनमानी कारभार चालवला असल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

Advertisements

प्राप्त तक्रारीनुसार यासंदर्भात सविस्तर असे की, मौजा सकमुर येथे सौ. अर्पणा अशोक रेचनकार या नवनियुक्त सरपंच झाल्या आहेत. पदभार स्वीकारताच नूतन ग्रा प कमेटीची परवानगी न घेताच त्यांनी काँक्रेट रोडच्या बांधकामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. सध्या रेतीचा लीलाव नाही. ज्या वॉर्डात काम केले जात होते त्या वॉर्डचे सदस्य संतोष मुगलवार यांनी सदर बांधकामासाठी रेती आणली कुठून? असा प्रश्न केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली.

Advertisements

नंतर मुगलवारने यासंदर्भात तक्रार केली असता पटवाऱ्याने ती रेती जप्त केली आणि पंचनामा करून ती रेती पोलीस पाटील चेकबापूर यांच्या स्वाधीन करण्यात आली. पटवाऱ्याने कोणताही प्रकारचा दंड वगैरे आकारला नाही.

प्रशासनाने जप्त केलेल्या या रेतीचा वापर करून काँक्रेट रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या सकमुर सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुगलवार यांनी तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.
या संदर्भात आम्ही प्रतिक्रियासाठी अशोक रेचनकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here