Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! भंगाराम तळोधी जवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन जण...

ब्रेकिंग न्यूज! भंगाराम तळोधी जवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी…

3272

गोंडपिपरी- विठलवाडा-तळोधी रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. अश्यातच आज दुपारी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकली एकमेकांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बंडू भाऊजी गदेकर मु गंगापुर टोक हे जागेवरच ठार झाले. ते काही कामानिमित्त भं तळोधी येथे जात होते आणि वाटेतच अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना गोंडपिपरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघातग्रस्तांची स्थिती गंभीर आहे. या अपघातात उर्मिला वेणूराज चिताळे, आशा अंकज कस्तुरे, अंश दिवाकर कस्तुरे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी गोंडपिपरी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Don`t copy text!