नागपुरात मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 195 नागरिकांविरुध्द कारवाई…

0
227

नागपूर, 23 फेब्रुवारी: जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 195 नागरिकांविरुध्द नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 97 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 33325 नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत 1,50,21,500 रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते.

नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here