चंद्रपुर- आंदोलक कोरोनापासून बचावासाठी घेत आहेत काळजी…

0
158

चंद्रपुर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरच्या पाचशे कंत्राटी कामगारांनी गेले 12 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसकट डेरा आंदोलन सुरू केले आहे. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केल्याने आंदोलनात कोणताही खंड पडू नये, यासाठी आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन कायम ठेवले. आजपासून हे सर्व आंदोलक मास्क बांधून आणि शारीरिक अंतर पळून आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात करण्यात आली.

Advertisements

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाशी लढताना, ‘ मी जबाबदार’ हा मंत्र दिला. त्याचे पालन आता हे आंदोलक करणार आहेत. एका शिस्तीत हे सर्व आंदोलक मंचावर उपस्थित होते. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा आहे, हे विशेष.

Advertisements

कोरोना काळात अत्यंत धाडसाने रुग्णसेवा केलेल्या या कामगारांचे सात महिन्यांचे वेतन आरोग्य विभागाने थकविले आहे. सतत पाठपुराव्यानंतर पदरी निराशा पडल्याने संतापलेल्या 500 कामगारांचे हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा असे सन्मानित करायचे आणि दुसरीकडे त्यांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी वणवण हिंडायला लावायचे, असा प्रकार चंद्रपूरच्या बाबतीत बघायला मिळाला आहे. या आंदोलनाला चंद्रपूरच्या विविध सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here