चंद्रपुरात पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 24 ते 26 फेब्रुवारीला

0
224
Advertisements

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे वतीने दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी,2021 रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे.
इच्छुक ऊमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:ची नांव नोंदणी करावे.

ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेले असेल अशा सर्व उमदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग ईन करुन दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी 2021, रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. यानंतर उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट व्हिडिओ कॉलींग इ. च्या माध्यमातून मेळावयाचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्याजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी कळविले आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here