सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे अखेर त्या सफाई कामगारांना मिळाला न्याय…

0
315

नागेश इटेकर  (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

अखेर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी गोंडपिपरी नगर पंचायत येथील कंत्राटी सफाई कामगारांचे उपोषण काल दिनांक 16-2-2021 ला प्रशासकीय स्तरावरुन मान्य झाल्याने उपोषण संपुष्टात आणण्यात आले .

युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरज भाऊ ठाकरे यांच्या अथक प्रयत्नांनी आणि त्यांच्या स्तरावरुन प्रशासना कडे वेळोवेळी केलेल्या पाठ पुराव्यामुळे येथील कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचा न्याय व हक्क मिळाला. त्याच प्रमाणे या संपुर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत कामगारांनी दाखवलेली एकता हि अत्यंत महत्वाची ठरली.

या सर्व प्रकरणांमध्ये नगरपंचायत चे कर्मचारी तथा कंत्राटदार यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास लवकरात लवकर करून संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे पुराव्या निशी सुरज ठाकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.त्यांच्या अथक परिश्रमाने कामगारांना न्याय मिळाला.कामगारांची गेल्या पाच वर्षांपासून थकीत रक्कम अंदाजे सव्वा करोड रुपये एक ते दीड महिन्यामध्ये मिळण्याचे चिन्ह असल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वेज बोर्ड नुसार आता चौदा हजार दोनशे पाच रुपये (14205/- ) इतके महिन्याचे वेतन 1 जानेवारी 2021पासून लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाने यापूर्वी झालेला आर्थिक घोळ दिनांक 9 मार्च 2019 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे कागदपत्रांसह लेखी स्वरूपी सादर करण्याचे आदेश सहायक कामगार आयुक्त यांनी दिले आहे.

38 कामगारांचे गेल्या पाच वर्षापासून थकित असलेले वेतनाचे व त्याचे पैसे अंदाजाने सव्वा करोड रुपये हा मोठा आर्थिक गोळ नगरपंचायत कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमतानेच झालेला असून सर्व प्रकरण आता उघडकीस आलेला आहे आणि यात ज्या कुणाचा सहभाग आहे ते सर्व कार्यवाहीस पात्र आहेत. आणि त्या सर्वांवर कार्यवाही करण्यास भाग पाडू असे युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री सुरज भाऊ ठाकरे यांनी इंडिया दस्तक टीव्ही न्यूज शी बोलताना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here