दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार…

0
278

चंद्रपुर: वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना सोमवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. दुर्गापुर येथील नरेश वामन सोनवणे (४० )हा इसम वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या खाण परिसरातील सेक्टर ५ मधून जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याच्या नरडीचा घोट घेतला.

Advertisements

शरीराचा काही भाग त्याने खाल्ला होता. सदर वार्ता समजताच घटनास्थळी ताबडतोब वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. वनविभागाकडून मृतकाचे नातेवाईकांना तातडीची १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here