काय सांगताय! तिथे खाल्ले जाते चक्क उंदराचे मांस अन तेही २०० किलो च्या भावात…

0
316

उंदीरचे नाव ऐकताच लोकांना त्यांच्यामुळे होणारे नुकसान आठवते, तेच उंदीर आसाममधील काही लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत बनले आहेत. आसाममधील कुमारिकाता या गावात उंदरांना आणि त्यांना पकडणार्‍या लोकांना बरीच मागणी आहे. हे गाव गुवाहाटीपासून 90 किमी अंतरावर आहे. भारत भुतानच्या सीमेवर हे गाव वसलेले आहे.

Advertisements

वास्तविक पाहता आसामच्या या गावात लोक उंदराचे मांस मोठ्या उत्साहाने आणि चविने खातात. या गावात 200 रुपये किलोने उंदीर विकले जातात. या गावच्या बाजारात बरेच आदिवासी मृत उंदीर उकळवून विकताना दिसतील.

Advertisements

स्थानिक शेतकरी उंदीर शिकार ही शेतीसाठी चांगले मानतात कारण ते त्यांच्या पिकांचे नुकसान करतात. पण उंदीर पकडणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. त्यांना पकडण्यासाठी आदिवासींना कठोर परिश्रम करावे लागतात. कधी कधी हे आदिवासी रात्रीदेखील शिकार करायला जातात.

आदिवासी उंदीरांच्या बिळासमोर सापळे ठेवतात, उंदीर अन्नाच्या शोधात बाहेर पडताच त्यामध्ये अडकतात. हे मृत उंदीर दुसर्‍या प्राण्याने पकडून नेऊ नयेत, म्हणूनच हे मृत उंदीर रात्री देखील गोळा केले जातात. सुरूवातीला तुम्हाला हे थोड किळसवाणे वाटेल, मात्र तेथील लोकांसाठी हे पारंपरिक खाद्य आहे. तिथे इतर प्राणी, पशू जास्त खाल्ले जात नाही.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here