मन हेलावून टाकणारी बातमी! सहायक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

0
745

नवी मुंबई: नवी मुंबई येथील एमएमसी पोलीस स्टेशनमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पहिल्या दिवशीच रूजू झालेल्या एका पोलीस निरीक्षकाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Advertisements

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी ही घटना घडली. भूषण पवार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. भूषण पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मागील 2 महिन्यांपासून ते रजेवर होते. दोन महिन्यांची रजा संपवून ते आज ड्युटीवर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करणाऱ्या खोलीत जाऊन त्यांनी पिस्तुलीतून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Advertisements

घडलेल्या या प्रकारमुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. भूषण पवार हे अत्यंत मनमिळावून स्वभावाचे होते. आत्महत्येचं पाऊल उचलतील अशी कुणालाही शंका नव्हती. पण, आज पोलीस स्टेशनमध्ये रूजू झाल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

त्यांनी उचललेल्या या टोकाचा पाऊलामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. भूषण पवार यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. एपीएमसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here