चंद्रपूर: चंद्रपुर शहर महानगरपालिका चंद्रपूर, आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत अभिनयसूत्रम् acting classes चे कलावंत विविध पुरस्काराचे मानकरी ठरले. या पुरस्काराचे वितरण महानगरपालिकेच्या हॉल मध्ये महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन स्वछ सर्वेक्षण 2021 चंद्रपूर महानगरपालिका तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत अभिनयसूत्रंम् टीम ने बाजी मारली. यात जिंगल, माहितीपट (documentri), म्युरल, आर्ट, पथनाट्य (स्ट्रीट प्ले), चित्रकला, कलापथक, शॉर्ट फिल्म इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
यात अभिनयसूत्रंम् चे प्रशिक्षक जगदीश अशोक नंदूरकर यांना माहितीपट व पथनाट्य स्ट्रीट प्ले मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला व अतुल मारोती येरगुडे यांना पथनाट्य स्ट्रीट प्ले मध्ये द्वितीय पुरस्कार मिळाला. अभिनयसूत्रंम् चे कलावंत इरफान शेख व तलाश खोब्रागडे यांना माहितीपट मध्ये द्वितीय क्रमांक आणि विघ्नेश्वर देशमुख व प्रणाली कवाडे यांना पथनाट्य चमू मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर च्या महापौर राखीताई कंचर्लावार व उपमहापौर राहुलजी पावडे, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांनी सर्व कलाकारांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. सर्व कलाकारांनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शिका मार्गदर्शक प्रा. डॉ. जयश्री कापसे गावंडे व प्रशिक्षक, नाट्यकलावंत, दिग्दर्शक श्री जगदीश अशोक नंदूरकर यांना दिले. अभिनयसूत्रंम् acting classes मार्फत जिल्ह्यातील सर्व वयोगटातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यत विविध शिबिरे आयोजित केल्या जातात. यात अभिनय, भाषण, सूत्रसंचालन, वक्तृत्व, वादविवाद इत्यादी विविध विषयांवर शिबीर होत असतात.
अभिनयसूत्रंम् चे कलावंत ठरले विविध पुरस्काराचे मानकरी…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES