बापरे! सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…

0
453

कॅनडातील रोरी व्हॅन उल्फ ही अवघ्या सात वर्षांची मुलगी सध्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ही चिमुरडी तब्बल 80 किलो वजन उचलून दाखवते. वेटलिफ्टिंगच्या दुनियेत ही मुलगी नवे विक्रम घडवणार हे उघडच आहे! रोरी हिने केवळ दोन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर हे यश मिळवले आहे. आपल्या पाचव्या वाढदिवसानंतर तिने वजन उचलण्याचा सराव सुरू केला होता. या दोन वर्षांच्या काळात तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, तसेच अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तिचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. हे अकाऊंट तिचे आई-वडील हाताळतात.

रोरी वजन उचलत असतानाचे फोटो व व्हिडीओ ते या अकाऊंटवर शेअर करतात. हे व्हिडीओ पाहून जगभरातील लोक तिचे कौतुक करीत आहेत.रोरी म्हणते की मजबूत, शक्‍तिशाली असणे हे मला आवडते. मजबूत असल्याने अधिक मेहनत करून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळते. मी नेहमी बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी सराव करणे आणि आणखी चांगली कामगिरी करणे यावर फोकस करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here