Advertisements
चंद्रपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अवैध बांबू ताटवे वाहतूक प्रकरणी मेटॅडोर जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Advertisements
इटोली- गिरीबिली या मार्गावर अवैधरित्या सरकारी वनातून बांबू कापून त्यापासून ताटवे तयार करून वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्या आधारे सापळा रचून अजयपूर येथील आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे यास मेटॅडोरसह ताब्यात घेऊन मानोरा क्षेत्र सहाय्यक प्रवीण विरुटकर, वनरक्षक प्रवीण बिपटे यांनी चौकशी केली. तेव्हा सदर वाहनात १४० नग ताटवे विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून वाहन व वनोपज जप्त करून आरोपी महेंद्र राखुंडे याचे विरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
Advertisements
Advertisements