यवतमाळ जिल्हातील एसटी बसेस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन…

454

यवतमाळ: महाराष्ट्रात कुठेही जाण्यासाठी आणि कुठे पोहोचण्यासाठी सर्व लोकांचा आधार म्हणजे एसटी महामंडळाच्या बसेस कोरोना काळात बंद असल्यामुळे लोकांना खूप गैरसोय झाली आहे. पण जसे जसे नियम आणि अटी प्रमाणे आवक-जावक सुरू झाली. तसेच बस सेवा सुद्धा काही प्रमाणात सुरू झाले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे 27 जानेवारी पासनं शाळा कॉलेजेस सुरू झाले असून विद्यार्थ्यांना बस सेवा नसल्यामुळे खूप असुविधा होत आहे. हा विषय अतिशय ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा असून ग्रामीण भागाचे भवितव्य हे तिथल्या विद्यार्थी ठरू शकते. त्यामुळे ये-जा करण्यासाठी महामंडळ करून बसेस सुरु असतात त्या बसेस या काळात सध्या बंद आहे.

तरीसुद्धा त्या बसेस पूर्णपणे सुरू करण्यासाठी शासनाचे व प्रशासनाचे महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्याचे काम आज संभाजी ब्रिगेडने केले आज यवतमाळ आगार व्यवस्थापक माननीय जोशी सरांना भेटून त्यावर सविस्तर चर्चा करून आणि कोणत्या पद्धतीने बस सेवा लवकरात लवकर चालू होईल यासाठी बोलण्यात आले शाळा तसेच कॉलेजच्या मुला आणि मुलींचे गैरसोय बघता लवकरात लवकरच बस सेवा सुरू होतील असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ खोब्रागडे यांना दिले.

 तसेच त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष शुभम पातोडे, जिल्हा निरिक्षक अनिकेत मेश्राम, जिल्हाकार्यकारणीचे सुरज पाटील,अंकुश पवार, प्राजक्ता भोयर,सचिन मनवर, अनिकेत आडे, अंकित कुटे, निहार गाडगे,रोहित लोहकरे, साक्षी सुखदेव,तनया नाईक, पूजा राठोड, वैष्णवी घोडेस्वार, उज्वला पवार, जयश्री मदकाम,रेश्मा मेश्राम, आचल निनावे, ऋषिकेश गिरी,निलेश बागडे, प्रतिक गोटे, ई उपस्थित होते