HomeBreaking Newsगोंडपिपरी तालुक्यात कोण बनेगा/बनेगी सरपंच ?; 8,9,10 फेब्रुवारीला ठरणार ...

गोंडपिपरी तालुक्यात कोण बनेगा/बनेगी सरपंच ?; 8,9,10 फेब्रुवारीला ठरणार …

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
कार्यकारी संपादक

गोंडपिपरी तालुक्यातील 43 ग्रामपंचायतचे नवे सरपंच कोण असतील हे ठरवण्यासाठी प्रशासनाने 8,9,10फेब्रुवारी या तारखा ठरवल्या आहेत .
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 18जानेवारीला जाहीर झाले .मधल्या काळात प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षण घोषित केले .
आता सरपंचपदाची निवडणूक कधी याबाबत प्रचंड उत्सुकता प्रत्येक गावात निर्माण झाली होती .बहुतेक गावातील नवनिर्वाचित सदस्यांना रणनीतीचा भाग म्हणून दूर वर हलविण्यात आले .अद्यापही बहुतेक गावचे सदस्य अज्ञातस्थळी असल्याचे कळते .
आता सरपंच निवडीची तारीख प्रशासनाने निश्चित केली आहे .काही दगा फटका होऊ नये म्हणून नेमक्या वेळी बहुतेक सदस्य सरपंच निवडीच्या सभेत दाखल होतील असे बोलल्या जात आहे .
तालुक्यातील मोठया ग्रा पं ती बद्दल थोडं बोलू या – भंगाराम तळोधी येथे 9फेब्रुवारी ला सरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे .येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित आहे .
धाबा येथे 10फेब्रुवारी ला सरपंच निवडीची प्रक्रिया होईल .सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )साठी आरक्षित आहे .
तोहोगाव येथे 9फेब्रुवारी ला सरपंच निवडली जाणार आहे .सर्वसाधारण महिला साठी सरपंचपद आरक्षित आहे .लाठी येथील सरपंच
9फेब्रुवारी ला जाहीर होणार आहे .अनुसूचित जाती (महिला )साठी सरपंचपद आरक्षित आहे .
पालकमंत्री यांचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करंजी येथे 8ला सरपंच निवडली जाणार आहे .नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )साठी सरपंचपद आरक्षित आहे .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!