ब्रेकिंग न्यूज! घुग्गुस येथे अवैध दारू तस्करीच्या कारवाहीत 3 लाखाचा मुद्देमाल जप्त…

0
224

चंद्रपूर:- घुग्गुस वणी येथून चंद्रपूर येथे दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी राजीव रतन चौकात सापळा रचून बलेनो कार क्रमांक एमएच 31 सिएन 3368 ला थांबवून तपासणी केली. त्यात अवैध देशी दारूच्या हजार नग 90 एमएल शिशा आढळून आल्या कार चालक अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून फरार झाला.

Advertisements

ही कारवाही गुरुवारच्या सकाळी 1.45 वाजता दरम्यान करण्यात आली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून देशी दारू किंमत 50 हजार व वाहन किंमत 2 लाख 50 हजार असा एकूण 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाही पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे सपोनि. गौरीशंकर आमटे, महेंद वनकवार, मनोज धकाते, प्रकाश येरमे, रंजित भुरसे, सचिन बोरकर व सचिन डोये व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलिस यांनी केली.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here